Advertisement

राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी गुरूवारी केला आहे.

राष्ट्रवादीचे ९ आमदार संपर्कात, भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा दावा
SHARES

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून कुठल्याही प्रकारे फोडाफोडीचं राजकारण होणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. असं असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी गुरूवारी केला आहे. 

हेही वाचा- कामाला लागा, भाजपचं ३ दिवसीय बैठकांचं आयोजन

याआधी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील भाजप सत्ता स्थापनेचा लवकरच दावा करेल. परंतु राज्यपालांकडे जाताना भाजपच्या हाती १४५ आमदारांच्या नावांची फाईल सोबत असेल, रिकाम्या हाताने जाणार नाही. भाजपला बहुमताचा आकडा गाठून देण्यासाठी जे काय प्रयत्न करायचे असतील, ते सर्व प्रयत्न आम्ही करू, असं वक्तव्य केलं होतं. 

हेही वाचा- शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरील दावा चुकीचाच, महाराष्ट्रातील सत्तापेचावर अमित शहा पहिल्यांदाच बोलले

राणे यांनी अप्रत्यक्षरित्या इतर पक्षातील आमदार फोडण्याचेच संकेत दिले होते. मात्र या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी कुठल्याही पक्षातील आमदार फुटून पक्षाबाहेर पडलेच, तर त्यापैकी कुणीही माई का लाल जिंकून येणार नाही. तिन्ही पक्ष मिळून आम्ही त्याला पुन्हा जिंकून देणार नाही, असा इशाराच दिला होता.

तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राणे यांनी व्यक्त केलेलं मत हे पूर्णपणे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचा खुलासा केला होता.  



हेही वाचा-

पुढचं सरकार भाजपचंच, फडणवीस यांना विश्वास

तर, कुणीही माई का लाल जिंकून येणार नाही, असं का म्हणाले अजित पवार?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा