तर, कुणीही माई का लाल जिंकून येणार नाही, असं का म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे​​​ नेते अजित पवार यांनी यापुढं कुणीही माई का लाल बंडखोरी करून जिंकून येणार नाही, असा थेट इशारा दिला.

SHARE

भाजप १४५ आमदारांचा आकडा गाठून लवकरच सत्ता स्थापन करेल, असं वक्तव्य नुकतंच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं होतं. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यापुढं कुणीही माई का लाल बंडखोरी करून जिंकून येणार नाही, असा थेट इशारा दिला.

काय म्हणाले राणे?

भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वजणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपला जेव्हा सत्ता स्थापन करायची असेल, तेव्हा १४५ आमदारांची यादी घेऊनच जाईल. रिकाम्या हाती जाणार नाही, असं राणे म्हणाले होते. भाजपकडे १०५ आमदार असल्याने राणेंनी एकप्रकारे इतर पक्षातील आमदार फोडणार असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं होतं. 

त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, अजित पवार म्हणाले की, राज्यात एकूण ४ मोठे पक्ष आहेत. यापैकी कुठल्याही पक्षाने बंडखोरी करुन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केल्यास उरलेले तिन्ही पक्ष मिळून त्याला पराभूत करू. त्यामुळे सध्याच्या स्थितीत तरी कुणी माई का लाल बंडखोरी करून जिंकून येणार नाही. 


हेही वाचा-

शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपकडून अडथळे- पृथ्वीराज चव्हाण

मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वाससंबंधित विषय
ताज्या बातम्या