Advertisement

पुढचं सरकार भाजपचंच, फडणवीस यांना विश्वास

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश देऊनही महायुतीचं सरकार बनवता आलं नाही, याची खंत आहे. परंतु काहीही झालं तरी पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुढचं सरकार भाजपचंच, फडणवीस यांना विश्वास
SHARES

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला जनादेश देऊनही महायुतीचं सरकार बनवता आलं नाही, याची खंत आहे. परंतु काहीही झालं तरी पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून त्यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. यानंतर राज्यपालांच्या सूचनेनुसार आपण काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

गेली ५ वर्षे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्रच्या जनतेचे आभार मानतो. तसंच आमच्यासोबत काम केलेले सगळे अधिकारी, कर्मचारी आणि शिवसेनेचेही मी आभार मानतो. ४ वर्षे दुष्काळाची, तर हे वर्ष अतिवृष्टीचं ठरुनही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं.

आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणूनच  जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला. अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असल्या, तरी निवडणुकीत आम्ही लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा आम्हाला मिळाल्या. असं असूनही आम्हाला युतीचं सरकार स्थापन करता आलं नाही, याबद्दल खंत वाटते. भविष्यात राज्यातील काळजीवाहू सरकार किती काळ चालेल किंवा राष्ट्रपती राजवट येईल किंवा नाही, हे सांगता येत नसलं, तरी भाजपचं सरकार नक्की येईल, असं ते म्हणाले.

हेही वाचा-

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम

वाचाळविरांमुळे युतीत दरी, मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्ष राऊतांवर टीका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा