Advertisement

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम

शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम असली, तरी आपल्यासमोर अशी कुठलीही बोलणी झालेली नाही. याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम
SHARES

शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम असली, तरी आपल्यासमोर अशी कुठलीही बोलणी झालेली नाही. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर एकदा आमची बोलणी फिस्कटली होती. परंतु त्यानंतर एकाही चर्चेत हा विषय झाला नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून त्यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मागील १३ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पेचावर भाष्य केलं.  

हेही वाचा- भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही - संजय राऊत

मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात विषय झालेला असेल तर ते मला माहीत नाही. परंतु मी जेव्हा अमित शाह आणि नितीन गडकरी यांना याबाबत विचारलं, तेव्हा त्यांनी असं काहीही ठरलेलं नसल्याचं सांगितलं.

जनतेने महायुतीला कौल दिला त्यानुसार राज्यात सत्ता स्थापन होणं आवश्यक होतं. सत्तेतील वाट्यासंदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. परंतु शिवसेनेने आमच्याशी चर्चा करण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली.

ज्यांच्यासोबत एकत्र निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत चर्चा न करता, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी शिवसेनेने दिवसातून तीन-तीन वेळेस चर्चा केली. ही भूमिका चुकीची असल्याचंही फडणवीस म्हणाले.



हेही वाचा-

वाचाळविरांमुळे युतीत दरी, मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्ष राऊतांवर टीका

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा