Advertisement

भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही - संजय राऊत

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस उलटल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे.

भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही - संजय राऊत
SHARES

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस उलटल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. असं असताना आजही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याची भुमिका मांडली. तसंच, भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचंही संजय राऊत यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

राष्ट्रपती राजवट

'अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल' असंही संजय राऊत यांनी म्हटलं. त्याशिवाय, सत्ता स्थापनेचा वाद सोडविण्याटी शुक्रवारी महाराष्ट्रात नितीन गडकरी येणार असल्याची चर्चा होती. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा - आमच्या आमदारांना भाजपकडून फोन, काँग्रेस, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार

महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा - महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता किती? राज्यपालांनी घेतली महाधिवक्त्यांची भेट


भाजपावर आरोप

'महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपाचा डाव आहे', असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा -

अमिताभ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

शिवसेनेला फोडाफोडीची भीती, सर्व आमदारांचा रंगशारदा हाॅटेलमध्ये मुक्काम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा