Advertisement

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सोनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा


शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सोनी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा
SHARES

सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाला सध्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन 'बीग बी' अमिताभ बच्चन करत आहे. हा कार्यक्रम लोकप्रिय असला तरी आता या कार्यक्रमावर आणि अमिताभ बच्चन यांना नेटकरी ट्रोल करत आहेत. याच कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळं लोकांमध्ये नाराजी पसरली असून अमिताभ यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी होत आहे.


प्रश्नाचे ४ पर्याय

कौन बनेगा करोडपतीच्या मागील शोमध्ये स्पर्धकाला मुघल बादशाह औरंगजेब याच्या समकालीन खालीलपैकी कोण होते? असा प्रश्न स्पर्धकासाठी स्क्रीनवर आला. या प्रश्नाचे ४ पर्याय देण्यात आले होते. त्या ४ पर्यायांमध्ये 'महाराणा प्रताप’, 'राणा सांगा’, 'महाराजा रणजीत सिंह' आणि छत्रपती 'शिवाजी' महाराज असे पर्याय देण्यात आले होते.

नावाचा एकेरी उल्लेख

डी या पर्यायात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ यांनी देखील पर्याय सांगताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरीच उल्लेख केला. विशेष म्हणजे प्रश्नात औरंगजेब याचा सम्राट असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळं या कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

सोनी कार्यालयासमोर निदर्शनं

या सगळ्याच्या निषेधार्थ मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, शुक्रवारी दुपारी १२ वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिली.



हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होण्याची शक्यता

चेंबूरमध्ये झाड पडून तिघं जखमी, जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा