Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होण्याची शक्यता

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली होती. या निदर्शनाचा परिणाम आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात होण्याची शक्यता
SHARES

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली होती. या निदर्शनाचा परिणाम आता एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होण्याची शक्यता आहे. कारण निदर्शने केल्याचा ठपका ठेवत मुंबईसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर ८ दिवसांत उत्तर न दिल्यास दिवाळी भेट आणि एका दिवसाचा पगार अशी एकूण रक्कम पगारातून कापण्याचे आदेश महामंडळानं दिले आहेत.

ऐन दिवाळीत निदर्शने

दिवाळीसाठी १२,५०० रुपये उचल देण्याच्या मागणीसह, खराब गाड्या, नादुरुस्त तिकीट मशीन अशा एकूण २० मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत निदर्शने केली. एसटीच्या मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा - एसटीची हंगामी भाडेवाढ मागे, कमावले दररोज २ कोटी रुपये

कारणे दाखवा नोटीस

दरम्यान, दिवाळी भेट देऊनही निदर्शने करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना महामंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महामंडळानं दिलेल्या नोटिशीमध्ये, '१९९५ ते १९९९ या काळात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रथमच २५०० रुपये भेट देण्याची सुरुवात केली. १९९९ ते २०१४ या काळात कर्मचाऱ्यांना भेट मिळाली नाही. २०१५ ते २०१८ या काळात कुणीही मागणी केली नसताना ही भेट दिली', असं स्पष्ट करण्यात आलं.

हेही वाचा - मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर धावणार शिवनेरी?

एकरकमी वसूल

महामंडळानं दिवाळी भेट देऊनही २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या निदर्शनात आपण सहभाग घेतला. दिवाळीपूर्वी रक्कम दिल्यानंतरही आंदोलन केलं. त्यामुळे दिवाळी भेट आणि एक दिवसाचं वेतन का कापू नये याचा खुलासा करावा. ८ दिवसांत खुलासा न केल्यास दिवाळी भेटीची व एक दिवसाच्या वेतनाची रक्कम पगारातून एकरकमी वसूल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असं ही महामंडळानं विभाग नियंत्रकाच्या मार्फत दिलेल्या नोटिशीत स्पष्ट केलं आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

महामंडळानं दिलेल्या नोटीस विरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विभाग नियंत्रकांनी दिलेल्या नोटीसमध्ये कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचं कामगारांचं म्हणण असून, २०पेक्षा अधिक मागण्यांसाठी जेवणाच्या सुट्टीत घोषणाबाजी करण्यात आली होती. याबाबत महामंडळाला आगाऊ पत्र देण्यात आलं होतं. पत्रानंतर २३ ऑक्टोबर रोजी चर्चेची बैठक महामंडळानं आयोजित केली होती. परंतु, ऐनवेळी ही बैठक रद्द झाली. त्यामुळं वेतनकपात केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा कामगार संघटनेनं दिला आहे.


हेही वाचा -

जोरदार पावसाचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

भाज्यांच्या दरामध्ये दुपटीनं वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा