Advertisement

भाज्यांच्या दरामध्ये दुपटीनं वाढ

अवकाळी पावसानं भाज्यांचे मोठं नुकसान झालं आहे.

भाज्यांच्या दरामध्ये दुपटीनं वाढ
SHARES

अवकाळी पावसानं भाज्यांचे मोठं नुकसान झालं आहे. माल खराब झाला असल्यानं, विकण्यायोग्य राहत नाही. त्यामुळं या मालाच्या किमती दुपटीपर्यंत वाढल्या असून, भाजी विक्रेते वाढीव दरानं भाजी ग्राहकांना विकत आहे. भाज्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एका भाजीच्या जुडीसाठी ८० ते १०० रुपये मोजावे लागतं असल्यानं इतर सामानासाठी काटकसर करावी लागते आहे. 

पावसाचा फटका

यंदा राज्यभरात सर्वत्र अवकाळी पावसाचा फटका भाज्यांवर बसल्याचं पाहायला मिळतं आहे. भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यामध्ये मुख्यत: पालेभाज्यांच्या दरांचा समावेश असून, पालक २० ते २५ रुपये जुडी, मेथी २५ ते ३० रुपये जुडीने विकली जात आहे.

हेही वाचा - कांद्यांच्या किंमतीत वाढ, मुंबईत ५० रुपये किलो कांदा

भाज्यांचे दर

अवकाळी पावसापूर्वी ३० ते ५० रुपयांना मिळणारी कोथिंबीर पावसानंतर १५० ते २०० रुपयांवर पोहोचली आहे. तर लसूणही २०० ते २२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. पावसापूर्वी पावकिलो १० रुपयांवर असलेल्या टोमॅटोसाठी आता २५ ते ३० रुपये मोजण्याची वेळ आली आहे. कांद्यानेही उच्चांक गाठला असून किरकोळ बाजारातील दर ५० ते १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.


हेही वाचा -

जोरदार पावसाचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबईत आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा, सहा जणांना अटक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा