Advertisement

कांद्यांच्या किंमतीत वाढ, मुंबईत ५० रुपये किलो कांदा


कांद्यांच्या किंमतीत वाढ, मुंबईत ५० रुपये किलो कांदा
SHARES

राज्याच्या अनेक भागात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान होत आहे. विशेष म्हणजे कांदाच्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळं बाजारातील कांद्याचे दर आकाशाला भिडले आहेतऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला ५५ रुपये प्रती किलो कांदा विकला जात होता. मात्र, आता ९० रुपयांपर्यंत विकला जात आहे. 

कांद्याचं मोठं नुकसान

राजस्थानमधील अलवर आणि नाशिकमधील लासलगाव इथून प्रामुख्याने राज्यात कांद्याचा पुरवठा होतो. मात्र, अवकाळी पावसामुळं यंदा कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शनिवारी प्रती १०० किलो कांद्याची ४ हजार ९०२ असलेली किंमत सोमवारी ५ हजार ५२१ वर गेली आहे. 

हेही वाचा - कांदा पोहोचला शंभरीजवळ, सामान्यांच्या डोळ्यात पाणी

५० रुपये किलो

दिल्लीमध्ये मंगळवारी कांद्याचा भाव ८० रुपये किलो होता. चेन्नईमध्ये ७० रुपये किलो आणि मुंबईमध्ये ५० रुपये किलो होता. मात्र, बुधवारी यामध्ये वाढ झाली असून, बोरिवली परिसरात प्रती किलो कांदे ६० रुपयानं विकले जात होते. कांद्यांचे दर वाढल्यानं हॉटेलमध्येही कांद्यांच्याऐवजी कोबी दिला जात आहे. 



हेही वाचा -

मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर धावणार शिवनेरी?

बीएमसी शाळांमधील मुलांमध्ये पोषणाचा अभाव



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा