Advertisement

कांदा पोहोचला शंभरीजवळ, सामान्यांच्या डोळ्यात पाणी

अवकाळी पावसामुळे कांदाच्या पिकाची नासाडी केल्याने बाजारातील कांद्याचे दर आकाशाला भिडले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यात कांद्याचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

कांदा पोहोचला शंभरीजवळ, सामान्यांच्या डोळ्यात पाणी
SHARES

अवकाळी पावसामुळे कांदाच्या पिकाची नासाडी केल्याने बाजारातील कांद्याचे दर आकाशाला भिडले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यात कांद्याचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. शहरांतील किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ६० ते ९० रुपये किलोवर पोहोचले आहेत.  

राजस्थानमधील अलवर आणि नाशिकमधील लासलगाव इथून प्रामुख्याने राज्यात कांद्याचा पुरवठा होतो. मात्र अवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात पोहोचणारा कांदा पोहचू शकलेला नाही. तसंच उपलब्ध कांदाही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आवक घटून कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. 

ऑक्टोबर महिन्यात ५५ रुपयांपर्यंत असलेले कांद्याचे दर आता ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर काही ठिकाणी कांदा ९० रुपयांवर गेला आहे. नवीन कांदा बाजारात यायला नोव्हेंबर अखेर होण्याची शक्यता असल्याने पुढील महिनाभर तरी कांद्याचे दर चढेच राहतील.  

कांद्याचे दर वाढत असल्याने सरकारही सतर्क झालं आहे. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत कांद्याची आवक वाढवण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांचा विचार झाला. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव कमी होतील, असं सरकारचं म्हणणं आहे. 



हेही वाचा-

पावसामुळं ५० ते ७० टक्के भाज्या कुजल्या

निर्यातबंदीनंतर मुंबईत कांद्याचे दर घसरले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा