Advertisement

निर्यातबंदीनंतर मुंबईत कांद्याचे दर घसरले


निर्यातबंदीनंतर मुंबईत कांद्याचे दर घसरले
SHARES

कांदा हा जेवणातील महत्वाचा घटक असल्यानं त्याला मोठी मागणी असते. परंतु, मागील काही दिवसांपासून कादा ग्राहकांना प्रचंड रडवत आहे. त्याच कारण म्हणजे वाढलेले भाव. काद्यांच्या भावात वाढ झाल्यानं ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आता शासनानं निर्यातबंदी केल्यानंतर मुंबईमध्ये कांद्याचे दर घसरले आहेत. होलसेल मार्केटमध्ये कांदा ३८ ते ४४ रूपये प्रति किलोवरून ३२ ते ३६ रूपये झाला आहे. त्याशिवाय, किरकोळ मार्केटमध्ये देखील कांदा ७० रूपयांवरून ५० रूपयांवर आला आहे.

७० रूपये किलो

मुंबईमध्येही मागणीपेक्षा कमी आवक होत असल्याने दोन महिन्यापासून सातत्याने दर वाढत होते. मुंबई बाजारसमितीमध्ये सोमवारी १०३६ टन कांद्याची आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये ३२ ते ३६ रूपये प्रतिकिलो दरानं कांदा विकला गेला. गत आठवड्यामध्ये हे दर ३८ ते ४४ रूपये किलोपर्यंत गेले होते. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ७० रूपये किलो दरानं विकला जात होता. सोमवारी हे दर ५० रूपयांवर आले आहेत. दर कमी झाल्याने ग्राहकांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.

भाज्यांच्या दरात वाढ

भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात अद्याप वाढ कायम आहे. होलसेल मार्केटमध्ये मागील आठवड्यात ३० ते ३५ रूपये किलो दरानं विकला जाणारा दुधी ३४ ते ३८ रूपये किलो दरानं विकला जात आहे. गाजर २६ ते ३० रूयांवरून ३० ते ३४ रूपये, कोबी १६ ते २० वरून २० ते २४ रूपये, टोमॅटो १० ते २२ वरून २४ ते ३२ रूपये झाला आहे.हेही वाचा -

ई-सिगारेटवर बंदी, देशभरात 'एव्हीआय'तर्फे आंदोलन

मी ब्ल्यू फिल्म बनवत नाही, राज ठाकरेंच्या उत्तराने हास्यकल्लोळ!संबंधित विषय
Advertisement