Advertisement

बीएमसी शाळांमधील मुलांमध्ये पोषणाचा अभाव

मुंबई महापालिकेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषण आहार दिला जातो. मात्र, या पोषण आहाराचा परिणाम मुलांवर होत नसल्याचं दिसून येत आहे.

बीएमसी शाळांमधील मुलांमध्ये पोषणाचा अभाव
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये मुलांना पोषण आहार दिला जातो. मात्र, या पोषण आहाराचा परिणाम मुलांवर होत नसल्याचं दिसून येत आहे. अंगणवाडीतील १७ टक्के, तर पालिका शाळांमधील तीन टक्के मुलांचं वजन हे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी असल्याचं प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

प्रजा फाऊंडेशनने माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे. २०१८-१९ मध्ये अंगणवाडीच्या २.८६  लाख मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८ हजार ८४९ म्हणजेच १७ टक्के मुलांमध्ये पोषणाची कमतरता दिसून आली. तर पालिका शाळेत शिकणाऱ्या २.२६ लाख मुलांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७३८३ मुलांचं वजन त्यांच्या वयानुसार कमी असल्याचं समोर आलं.  पोषण आहाराच्या कमतरतेमुळे मुलांचं वजनच कमी होत असल्याचं दिसून आलं.

 आकडेवारीनुसार २०१७ मध्ये ० ते १९ वयोगटातील ३२ मुलांचा मृत्यू योग्य प्रकारचा आहार न मिळाल्यामुळे झाला. २०१७ मध्ये ४३७ मुलांना टीबी, तर १०९ मुलांना डेंग्यूमुळे जीव गमावावा लागला आहे. २०१८-१९ मध्ये पालिका अर्थसंकल्पात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्यासाठी २५ कोटींची तरतूद केली होती. मात्र शाळांमध्ये हा आहार देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे हे पैसे वाया गेले का, असा प्रश्न प्रजा फाऊंडेशनने उपस्थित केला आहे. हेही वाचा- 

'एक बीज एक सावली' पर्यावरणप्रेमींचा नवा उपक्रम

अयोध्या निकालापूर्वी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

संबंधित विषय