Advertisement

'एक बीज एक सावली' पर्यावरणप्रेमींचा नवा उपक्रम

एक बीज एक सावली हा उपक्रमात बीज गोळा करून त्यातून संस्थेच्या आवारात रोपे तयार केली जातात. ४ महिन्यांमध्ये ही तयार केली गेली. त्यातल्या रोपांची लागवड आरेतल्या जंगलात करण्यात आली.

'एक बीज एक सावली' पर्यावरणप्रेमींचा नवा उपक्रम
SHARES

आरेतल्या मेट्रो ३ च्या कारशेडसाठी रातोरात झाडांची कत्तल करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी संतप्त पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला. झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी स्थानिकांच्या मदतीनं आंदोलन सुरू केलं. पण या पर्यावरणप्रेमींची पोलिसांनी धरपकड करत आंदोलन दाबलं. पण पुन्हा एकदा आंदोलकांनी पर्यावरणासाठी पुढाकार घेत एक नवा उपक्रम सुरू केला आहे.

एक बीज एक सावली

एक बीज एक सावली या उपक्रमांतर्गत आरेमध्ये ३०० रोपांची लागवड केली आहे. एक बीज एक सावली या उपक्रमांतर्गत आरेमध्ये जॅकफ्रूट, जांभूळ, काटेसावर, चिंच, पपई आदी रोपांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांवर ४० विविध प्रजातींचे पक्षी आढळून येतात. या उपक्रमात ६०० पर्यावरणप्रेमी जोडले गेले आहेत.

पर्यावरण रक्षणासोबतच समाजसेवा

एक बीज एक सावली हा उपक्रमात बीज गोळा करून त्यातून संस्थेच्या आवारात रोपे तयार केली जातात. ४ महिन्यांमध्ये ४ हजार ८०० रोपे तयार केली गेली. त्यापैकी ३०० रोपांची लागवड आरेतल्या जंगलात करण्यात आली.

तयार केलेली रोपे ही रोपे शाळा, महाविद्यालये, संस्था-संघटनांना दिली जातात. या बदल्यात गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी आवाहन करण्यात येते. एका रोपामागे एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चाची मदत मागितली जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १२० ते १३० विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.      



हेही वाचा

अरे बापरे! 'या' कारणामुळे २०५० पर्यंत मुंबई होणार गायब

गॅस चेंबर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा