Advertisement

अरे बापरे! 'या' कारणामुळे २०५० पर्यंत मुंबई होणार गायब

रिचर्सनुसार २०५० पर्यंत मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

अरे बापरे! 'या' कारणामुळे २०५० पर्यंत मुंबई होणार गायब
SHARES

समुद्रातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. या यादीत मुंबईचं देखील नाव आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, पाण्याची पातळी वाढल्यामुळे जगभरातील १५ कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. मुंबई शहराला देखील याचा मोठा फटका बसणार आहे

भविष्यात मुंबई धोक्यात

रिचर्सनुसार समुद्रातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं २०५० पर्यंत मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या पातळीची गणना करण्यात आली आहे. यावरून ही पातळी वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केला आहे.


कसे वाचणार मुंबईकर?

आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईचा संपूर्ण विनाश होणार आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबईचा बहुतांश भाग हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. "मुंबईतील लोकांना वाचवण्यासाठी योजना आखण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासून तयारीला सुरुवात करणं गरजेचं आहे," असं आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मायग्रेशन संस्थेच्या कॉर्डिनेटर डायना लोनेस्को यांनी सांगितलं.

जगभरातील देश धोक्यात

मुंबईसोबतच आशियाई खंडातील सर्वात प्रगतशील असा शांघाय पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतो. अलेक्झेंड्रिया आणि इराण देशावरही याचं संकट आहे


हेही वाचा

कयार चक्रीवादळ मुंबईपासून दूर, पण...

मेट्रो प्रकल्पामुळं झाडांची होणारी हानी टाळण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ५१ हजार वृक्षारोपण


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा