मुंबईत आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा, सहा जणांना अटक

28 आँक्टोंबर रोजी सहा जणांच्या टोळीेने अगदी 'फिल्मीस्टाईल'ने ही बँक लुटण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या एटीएममध्ये शिरताच आरोपींनी सुरक्षा रक्षकाला चाकूच्या धाकावर डांबून ठेवले.

SHARE
मुंबईच्या नागपाडा परिसरातील मराठा मंदीरजवळील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा नागपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना उत्तरप्रदेशहून अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 48 तासात पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस  आणला आहे.


नागपाडा परिसरातील नायर रोडवर मराठा मंदीर शेजारी आयसीआयसीआय बँकेची शाखा व एटीएम आहे. दरम्यान 28 आँक्टोंबर रोजी पहाटे 4 वा. सहा जणांच्या टोळीेने अगदी 'फिल्मीस्टाईल'ने  ही बँक लुटण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या एटीएममध्ये शिरताच आरोपींनी सुरक्षा रक्षकाला चाकूच्या धाकावर डांबून ठेवले. त्यानंतर गँस कटरच्या मदतीने एटीएममशीन तोडण्याचा प्रयत्न केला. माञ एटीएममशीन उघडत नसल्याने आरोपींनी हाताला मिळेल ते सामान चोरून तेथून  पळ काढला. 


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एटीएममधाल आणि परिसरातील सीसीटिव्ही फूटेज काढत खबऱ्यांना कामाला लावले. त्यावेळी एका आरोपीची ओळख पोलिसांना पटली. हा गुन्हा करून आरोपी त्याच्या उत्तरप्रदेश येथील गावी फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये जावून अर्जुन किशोर चौधरी (23)याला अटक केली. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यांत पुढे त्याचे साथीदार मन्नुकुमार मदन प्रसाद (20), संदीपकुमार राजेंद्र प्रसाद (21), रविकुमार गुप्ता (23), यांना ही उत्तरप्रदेशहून अटक करून मुंबईत आणले. तर काही आरोपींनी  गावी न पळ काढता. बिहारमध्ये लपून राहण्याचा प्रयत्न केला. माञ ते यशस्वी झाले नाही. बिहारमधून पोलिसांनी अमितकुमार सिंग (24),रोहितकुमार चौधरी (21) यांना अटक करून मुंबईत आणले.


या सहा जणांच्या टोळीवर नागपाडा पोलिस ठाण्यात 341,342, 357, 452 आणि 379 भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली.
संबंधित विषय
ताज्या बातम्या