Advertisement

जोरदार पावसाचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबईसह उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

जोरदार पावसाचा रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
SHARES

मुंबईसह उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वांद्रे, खार, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तर सायन, वडाळा परिसरातही पावसाने जोर धरला आहे. मात्र, आता या पावसाचा मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


वाहतुक कोंडी

रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटांनी धावत आहे. तर मुंबईच्या अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान विभागानं अरबी समुद्रात 'महा' नावाचं चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती दिली होती. मात्र, या वादळाचा मुंबईच्या किनारपट्टीला धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं.

हेही वाचा - चेंबूरमध्ये झाड पडून तिघं जखमी, जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

अतिवृष्टीचा इशारा

वादळाची तीव्रता वाढल्यानं पालघर, ठाणे, रायगडसह राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. पहाटेपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली असून ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही जोरदार पाऊस आहे.


हेही वाचा -

सावधान...रेल्वे ट्रॅक ओलांडल्यास तुम्हाला उचलेल यमराज

चेंबूरमध्ये झाड पडून तिघं जखमी, जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा