Advertisement

अवकाळी पावसामुळं मच्छीमारांचं नुकसान


अवकाळी पावसामुळं मच्छीमारांचं नुकसान
SHARES

महाराष्ट्रातील अनेक भागात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं पिकांच मोठं नुकसानं झालं आहे. या पावसामुळं मच्छीमारांनाही मारेमारीसाठी समुद्रात जात येत नाही आहे. त्यामुळं त्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून, मच्छीमारांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पावसाळ्यातील मासेमारीच्या काळात चक्रीवादळं, अतिवृष्टी आल्यानं मच्छीमारांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच २५ हजारांची मदत आणि नौका मालकांना एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी ‘अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती’ने केली आहे.

समुद्रात न जाण्याचा इशारा

पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी असते. तसंच, अनेक पारंपरिक मच्छीमार १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीस समुद्रात जात नाहीत. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला आणि त्यानंतर अनेक वेळा अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळं आणि अतिवृष्टीमुळं मासेमारी करण्यास समुद्रात न जाण्याचे इशारे देण्यात आले.

सामग्रीचं बरंच नुकसान

मासेमारीसाठी जाताना बर्फ, डिझेल, शिधा आणि इतर साहित्य घेऊन गेलेल्या मच्छीमारांना अनेकदा किनाऱ्यावरूनच परत फिरावं लागलं. तर वादळामध्ये अडकलेल्या नौकांचं आणि सामग्रीचं बरंच नुकसान झालं आहे. चक्रीवादळाचा फटका किनाऱ्यांनादेखील बसल्यामुळं सुकवत ठेवलेल्या मास्यांचही नुकसान झालं आहे.

१ लाख रुपयांचं अनुदान 

या सर्व नुकसानीचा योग्य तो विचार करून पंचनामे व्हावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. मच्छीमारांच्या मागण्यांसदर्भात तांडेल यांनी मंगळवारी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. हवामानातील बदलामुळं यावर्षी खूप नुकसान झालं असून, खर्चदेखील निघालेला नाही. त्यामुळं प्रत्येक मच्छीमारास २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि नौका मालकांना १ लाख रुपयांचं अनुदान द्यावं, अशी मागणी करण्यात आली.



हेही वाचा -

ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं- संजय राऊत

कांद्यांच्या किंमतीत वाढ, मुंबईत ५० रुपये किलो कांदा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा