Advertisement

ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं- संजय राऊत


ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं- संजय राऊत
SHARES

शिवसेनेचे खासदार संजय राऊत मागील अनेक दिवस सकाळच्या सुमारास पत्रकार परिषद घेत आहेत. शुक्रवारीही त्यांची पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही, असं म्हटलं आहे. शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

आमचे आमदार निष्ठावान

'शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही’, असं राऊत यांनी म्हटलं.


हेही वाचा - सरकार स्थापनेवर शरद पवार यांचं मोठं विधान, शिवसेनेला धक्का?


आमदार फोडाफोडी

'राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत आमदार फोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. अनेक राज्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही’, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.


हेही वाचा - शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये २ गट? दलवाईंनी घेतली राऊतांची भेट


शिवसेनेची भूमिका

'शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं. मी कोणत्याही प्रकारची शेरेबाजी नाही करत. मी केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका तुमच्या समोर मांडतो. मी केवळ पक्षाचं काम करत आहे. आमच्या शुभेच्छा भाजपासोबत आहेत. त्यांनी आपलं बहुमत सिद्ध करावं. लवकरच गोड बातमी देणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणतात. पण गोड बातमी काय आहे, हे पहावं लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच आहे, अशी गोड बातमी एक दिवस सुधीर मुनगंटीवार देतील’, असं स्पष्ट वक्तव्य राऊत यांनी यावेळी केलं.



हेही वाचा -

'या' भितीमुळं शिवसेना सर्व आमदारांना हलवणार अज्ञात स्थळी

कांद्यांच्या किंमतीत वाढ, मुंबईत ५० रुपये किलो कांदा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा