Advertisement

सावधान...रेल्वे ट्रॅक ओलांडल्यास तुम्हाला उचलेल यमराज

अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. अशा प्रवाशांना अटकाव करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने एक अफलातून मोहीम राबवली आहे.

सावधान...रेल्वे ट्रॅक ओलांडल्यास तुम्हाला उचलेल यमराज
SHARES

तुम्ही रेल्वे ट्रॅक ओलांडत असाल तर सावधान... कारण आता तुम्हाला साक्षात यमराजच उचलणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक ओलांडल्यास त्यांना थेट यमराजाशी म्हणजे मृत्यूशीच सामना करावा लागणार आहे. 


मुंबईत  रेल्वे रूळ ओलांडताना रोज अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. रेल्वे रूळ न ओलांडण्याचं आवाहन रेल्वेकडून वारंवार केलं जातं. मात्र, तरीही अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. अशा प्रवाशांना अटकाव करण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने एक अफलातून मोहीम राबवली आहे. पश्चिम रेल्वेने अंधेरी स्थानकात एक यमच आणला होता. हा यमराज रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना ट्रॅकवर आणून ठेवत होता. त्यांना कधी उठाबशा काढायला लावत होता. तर कधी समज देऊन सोडत होता. तसंच यमराज त्यांना पूल किंवा सबवे वापरा असा सल्ला देत होता.

पश्चिम रेल्वेने एका आरपीएफच्या जवानाला यमाच्या वेशात आणले होते. अंधेरी, मालाड, गोरेगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक क्रॉस केला तर उचलेल यमराज ही मोसावधान...रेल्वे ट्रॅक ओलांडल्यास तुम्हाला उचलेल यमराजहीम राबवण्यात आली. फलक लावून, जाहिरात करूनही अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. यात अनेक प्रवाशांचा जीवही जातो. ह्या घटनांना आळा बसावा म्हणून पश्चिम रेल्वेने ही आगळीवेगळी मोहीम राबवली.हेही वाचा -

ट्रान्स हार्बरवर प्रवाशांना लोकलच्या प्रथम दर्जा डब्यातून प्रवास करण्याची मुभा
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा