Advertisement

एसटीची हंगामी भाडेवाढ मागे, कमावले दररोज २ कोटी रुपये

एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात येतील.

एसटीची हंगामी भाडेवाढ मागे, कमावले दररोज २ कोटी रुपये
SHARES

एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून मागे घेण्यात आली आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात येतील.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या मोसमात २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मूळ तिकीटावर सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. यामध्ये एसटीच्या साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) या बस सेवांचा समावेश होता.

या भाडेवाढीच्या माध्यमातून एसटीला दररोज सरासरी २ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला. हा कालवधी ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संपत असल्याने ६ नोव्हेंबरपासून एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. 

हेही वाचा-

मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर धावणार एसटी ७० जादा बसेस

एसटी प्रवाशांच्या खिशाला एेन दिवाळीत कात्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा