एसटी प्रवाशांच्या खिशाला एेन दिवाळीत कात्री

एसटीचा महसूल वाढवण्यासाठी व्हावा म्हणूनच भाडेभाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिवाळीच्या काळात एसटीचे भाव नेहमीपेक्षा थोडे अधिक असतील.

एसटी प्रवाशांच्या खिशाला एेन दिवाळीत कात्री
SHARES

दिवाळीच्या काळात एसटीनं १० टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या काळात एसटी बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. याचाच फायदा एसटीचा महसूल वाढवण्यासाठी व्हावा म्हणूनच भाडेभाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिवाळीच्या काळात एसटीचे भाव नेहमीपेक्षा थोडे अधिक असतील

कुठल्या बसेसना भाडेवाढ

एसटीची भाडेवाढ सर्वच बसेससाठी नसेल. एसटीच्या काही नेमक्या बसेसना ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. साधी, निमआरामी (हिरकणी) आणि शिवशाही (सिटर) या बसेसला भाडेवाढ लागू राहणार आहे. तर शिवशाही (स्लिपर) शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला भाडेवाढ लागू करण्यात आली नाही.

कधीपासून लागू होणार भाडेवाढ

२५ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ लागू होणार आहे. सणासुदीच्या काळात एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असतो. या काळात महसूलात वाढ करण्यासाठी ३० टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटीला दिला आहे. त्यानुसार केलेली १० टक्के भाडेवाढ २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

एसटीच्या जादा गाड्या

दरवर्षीप्रमाणे दिवाळीत प्रवाशांची वाढती गर्दी पाहता २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. जवळपास ३ हजार ५०० बसेस सोडण्यात येणार आहेत. गर्दी अधिक असेल तर अणखी बसेस एसटी तर्फे सोडण्यात येतील.  हेही वाचा

दिवाळीसाठी एसटीच्या ३५९ विशेष जादा बस

बेस्ट कर्मचाऱ्यांचा यंदाही दिवाळी बोनस रखडला


संबंधित विषय