Advertisement

दिवाळीसाठी एसटीच्या ३५९ विशेष जादा बस


दिवाळीसाठी एसटीच्या ३५९ विशेष जादा बस
SHARES

दरवर्षी दिवाळीसाठी मुंबईसह राज्यभरातील अनेक जण आपल्या गावी जातात. तसंच, गावी जाण्यासाठी प्रवासी एसटीचा प्रवास पसंत करतात. मात्र, यंदा दिवाळी तोंडावर असताना देखील एसटी प्रशासनानं विशेष बस सोडण्याचा नियोजन केलं नव्हतं. मात्र, अखेर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत आणि या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी एसटी प्रशासन दररोज ३५९ जादा विशेष बस सोडणार आहे.

जादा बस 

राज्यातील प्रत्येक आगारातून २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत जादा बस सोडण्यात येणार आहेत. २५ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, २७ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, २८ ऑक्टोबरला दीपावली पाडवा,बलिप्रतिपदा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज आहे. विशेष बसच्या आरक्षणाची सुविधा एसटीनं प्रवाशांसाठी प्रत्येक आगार, बस स्थानकावर उपलब्ध करून दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कमी

दिवाळी हंगाम संपेपर्यंत एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. तसंच, दिवाळी तिकीट दरवाढ न केल्यानं प्रवाशांना दिलासा मिळला आहे. मुंबईतून १२, ठाणे १९, पालघर २२, रत्नागिरी १४, सिंधुदुर्ग ८, पुणे ६४, कोल्हापूर ७, सातारा ३, सांगली ४, अमरावती २, यवतमाळ ५, नाशिक २३, जळगाव ८, धुळे ३५, अहमदनगर ९, औरंगाबाद १४ बीड ९, जालना ५, लातूर १०, नांदेड १३, उस्मानाबाद ११, परभणी २३ अशा जादा विशेष बस सोडण्याचं नियोजन एसटीनं केलं आहे.



हेही वाचा -

मेट्रो प्रकल्पामुळं झाडांची होणारी हानी टाळण्यासाठी एमएमआरडीएमार्फत ५१ हजार वृक्षारोपण

दिंडोशी येथील डोंगरावर पुन्हा लागणार आग?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा