Advertisement

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 'इतक्या' जादा बसेस


कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 'इतक्या' जादा बसेस
SHARES

पंढरपूर इथं ८ नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीनं महाराष्ट्रातील विविध बसस्थानकावरून सुमारे १३०० जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे. ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये हि जादा वाहतूक करण्यात येणार आहे. त्याशिवाय आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याचे निर्देशही स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत.

विठ्ठलाचं दर्शन

कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रतील भाविक प्रवाशाची सोय करण्याच्या हेतूनं दरवर्षीप्रमाणं एसटीने यंदाही १३०० जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते.

हेही वाचा - राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?

विशेष जादा बसेस

या ५ विभागातून मुंबई-११०, रायगड-१००, सिधुदुर्ग-३०, ठाणे-३०, रत्नागिरी-१२० विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर इथं स्थानिक बसस्थानका बरोबरच चंद्रभागा नगर इथं विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच, भाविक प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.



हेही वाचा -

मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करताय.... मग सावधान!

शाळांच्या उपाहारगृहामध्ये जंकफूडच्या विक्रीवर निर्बंध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा