Advertisement

शाळांच्या उपाहारगृहामध्ये जंकफूडच्या विक्रीवर निर्बंध


शाळांच्या उपाहारगृहामध्ये जंकफूडच्या विक्रीवर निर्बंध
SHARES

शाळेतील विद्यार्थी जंक फुडचं सेवन सर्वाधिक करतात. मात्र हे जंक फूड आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शाळांच्या उपाहारगृहामध्ये जंकफूडच्या विक्रीवर आता निर्बंध घालण्यात येणार आहे. कमी पोषणयुक्त पदार्थाची शाळेच्या आवारात कोणत्याही स्वरूपात जाहिरात करण्यासही बंदी असणार आहे.

स्थूलतेवर नियंत्रण

बालकांमधील वाढत्या स्थूलतेवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार, शाळेच्या आवारात पोषणयुक्त पदार्थाना प्रोत्साहन दिले जावे. शाळेसाठी निधी उभारण्यासाठीचं उपक्रम, शैक्षणिक साहित्य, शाळेची मालमत्ता, शाळेमधील कोणतेही शैक्षणिक कार्यक्रम यामधून कमी पोषणयुक्त पदार्थाचे वितरण, विक्री करू नये. तसेच या पदार्थाच्या ब्रॅण्डचं नाव, लोगो या माध्यमांतून शाळेच्या आवारात प्रसिद्धीही केली जाऊ नये याची खबरदारी शाळा प्रशासनाने घ्यावी.


उपाहारगृहाचं वेळापत्रक

शाळेत विविध पोषक अन्नपदार्थ उपलब्ध असतील, यासाठी शाळा प्रशासनानं उपाहारगृहाचे वेळापत्रक तयार करावे. एकदा वापरलेल्या तेलाचा वापर शक्यतो पुन्हा करू नये. शाळेतील उपाहारगृहावर देखरेख करण्यासाठी शाळा प्रशासनाने समन्वयकाची नेमणूक करावी. राज्य अन्न सुरक्षा विभागानेही उपाहारगृहांची वारंवार तपासणी करावी. हा कायदा देशभरातील सर्व बोर्डाच्या शाळा, निवासी शाळा आणि पाळणाघर यांना लागू असेल.



हेही वाचा -

राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?

यंदाही आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा