मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करताय.... मग सावधान!

लोकलच्या तिकीट आणि पासवर मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाईसाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. यासाठी मध्य रेल्वेने एक पथकच तयार केलं आहे.

SHARE

मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीने रोज प्रवाशी चांगलेच हवालदील होतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करणं टाळत अनेक प्रवासी मेल-एक्स्प्रेसने प्रवास करतात. मात्र, अशा प्रवाशांना आता दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे लोकलच्या तिकीट आणि पासवर  मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाईसाठी मध्य रेल्वेने कंबर कसली आहे. यासाठी मध्य रेल्वेने एक विशेष पथकच तयार केलं आहे. हे पथक आज बुधवारपासून तीन दिवस कार्यरत असणार आहे.  कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसवर या पथकाची करडी नजर असेल. 

गर्दी टाळण्यासाठी लोकलचे प्रवासी नेहमी मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करतात. अनेकदा हे प्रवाशी आरक्षित डब्यातून जातात. याचा त्रास मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांना होतो.  मेल-एक्स्प्रेसमध्ये अशी घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांच्या अनेक तक्रारी रेल्वेला मिळाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांवर आता कारवाई होणार आहे. कल्याण स्थानकातून सीएमएमटीकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस तपासणीसाठी विशेष तिकीट तपासनीसांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अशा प्रवाशांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

आता बुधवार ६ नोव्हेंबर ते शुक्रवार ८ नोव्हेंबर या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. रोज सहा एक्स्प्रेस अशा एकूण १८ एक्स्प्रेसमध्ये तपासणी करण्यात यावी. विशेष तिकीट तपासणीसांच्या पथकाला प्रत्येकी पाच रेल्वे सुरक्षा जवानांची सुरक्षा पुरवण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. हेही वाचा -

अनधिकृतपणे रेल्वे तिकीटांची विक्री करणाऱ्यांवर मध्य रेल्वेची कारवाई

२०१८-१९ या आर्थिक वर्षात रेल्वे बिघाडात 'इतकी' वाढ
संबंधित विषय
ताज्या बातम्या