अनधिकृतपणे रेल्वे तिकीटांची विक्री करणाऱ्यांवर मध्य रेल्वेची कारवाई

रेल्वेच्या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या २ जणांना रेल्वे पोलीसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अनधिकृतपणे रेल्वे तिकीटांची विक्री करणाऱ्यांवर मध्य रेल्वेची कारवाई
SHARES

रेल्वेच्या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या २ जणांना रेल्वे पोलीसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रदीप गंगवानी आणि इकबाल बासिक अली खान अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांकडून मध्य रेल्वेने ८,०१,१३४ रुपयांची एकूण १९९ तिकिटे जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - लोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी दिला चोप

दुकानावर छापा

घाटकोपरमधील एस. बी. टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स या दुकानावर रेल्वे सुरक्षा दलानं छापा मारून कारवाई केली. त्यावेळी पोलीसांनी त्या दुकानातून तिकीट आरक्षणासाठी वापरण्यात आलेले पाच संगणक, एक मोबाइल आणि रेल्वे तिकीट आरक्षणासाठी वापरण्यात येणारी डायरीही जप्त केली.

हेही वाचा - टिकटाॅक व्हिडीओसाठी धावत्या लोकलमध्ये स्टंट, तरूणाला अटक

तिकिटांची विक्री

अनधिकृतपणे तिकिटांची विक्री करणाऱ्या प्रदीप गंगवानी आणि इकबाल बासिक अली खान या दोघांकडून मध्य रेल्वेने ८,०१,१३४ रुपयांची एकूण १९९ तिकिटे जप्त केली. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.



हेही वाचा -

२०१८-१९ या आर्थिक वर्षात रेल्वे बिघाडात 'इतकी' वाढ

एसटी चालकाचे अपहरण करून लुटणारे अटकेत



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा