Advertisement

लोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी दिला चोप


लोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी दिला चोप
SHARES

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये मद्यपान करणाऱ्यांना काही प्रवाशांनी चोप दिल्याची माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दारू पिणाऱ्यांना प्रवाशांनी दारू प्यायची जागा आहे का असा प्रश्न विचारला असता त्यांनी उलट उत्तर देण्यास सुरूवात केली. त्यानंतर प्रवाशानी त्यांना चांगलाच चोप दिल्याचं पाहायला मिळतं आहे.


लोकलमध्ये दारू

काही प्रवासी लोकलमध्ये दारू पियत होते. त्यावेळी एकाच्या हातात बाटली देखील होती. त्यामुळं काही प्रवाशांनी त्यांना याबाबत समज देत 'मुंबईची लोकल ट्रेन ही दारु पिण्याची जागा नाही', असं सांगितलं. मात्र, त्यावेळी त्या दारुड्यांनी बाचाबाची सुरु केली. त्यानंतर संतापलेल्या इतर प्रवाशांनी या दारुड्यांना चांगलाच चोप दिला.


दरम्यान, ही लोकल कोणत्या मार्गावरील आहे. त्या दारुड्यांच नाव काय? याबाबत माहिती मिळालेली नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत.हेही वाचा -

मतदानाची सक्तीच करायला हवी- नाना पाटेकर

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का घसरलाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा