Advertisement

मतदानाची सक्तीच करायला हवी- नाना पाटेकर

विधानसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.

मतदानाची सक्तीच करायला हवी- नाना पाटेकर
SHARES

विधानसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. यंदा तरुणांसह अनेकांनी मतदान केलं नसून, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला आहे. परंतु, सध्यस्थितीत मतदार निवडणुकीचं गांभिर्य लक्षात घेत नाहीत. त्यामुळं मुंबईसब राज्यभरात मतदानाची टक्केवारी कमी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात सर्वत जास्त मतदान कोल्हापूरमध्ये झालं असून सर्वात कमी मतदान मुंबईतील कुलाबा इथं झालं आहे. दरम्यान, मतदानाची ही स्थिती लक्षात घेता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी 'मतदानाची आता सरकारनं सक्तीच करायला हवी', असं मत व्यक्त केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केलं.

मतदानासाठी गर्दीही कमी

मतदानाच्या दिवशी लोक मतदानाबाबत फारसे उत्साही दिसले नाहीत. मतदानासाठी गर्दीही कमी होती. त्यामुळं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मतदानाची आता 'सरकारनं सक्तीच करायला हवी असं मत व्यक्त केलं आहे. सक्ती केल्यावरच लोक मतदान करतील का? त्यासाठी बाहेर पडतील का? तसं नसल्यास घरी बसून मतदान कसं करायचं याची सोय सरकारनं केली पाहिजे', असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

प्रचारावरही टीका

याशिवाय निवडणूक प्रचाराबाबतही नाना पाटेकर यांनी टीका केली. 'निवडणूक प्रचार का केला जातो? जर एखाद्या पक्षानं कामं केली आहेत, तर लोक त्यांना निवडून देतील. प्रचार हा प्रकारच मला पटत नाही. मी जर एखादी चांगली गोष्ट केली असेल एक पक्ष म्हणून मग तो कोणताही पक्ष असेल. चांगलं काम केलं असेल तर लोक मतदान करतील. फक्त उमेदवारी जाहीर केली जावी. प्रचाराचा गोंधळ थांबवला की एकमेकांची उणीधुणी काढणं, एकमेकांवर आरोप करणं, आरोपांच्या फैरी झाडणं हे बंद होईल. निवडणुकीचा अमाप खर्च बंद होईल', असं मतही नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. 



हेही वाचा -

विधानसभा निवडणूक २०१९: १६०० मतदार मतदानापासून वंचित

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का घसरला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा