Advertisement

maharashtra assembly elections 2019: मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का घसरला

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी यंदा सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

maharashtra assembly elections 2019: मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का घसरला
SHARES

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांमध्ये मतदान झालं. सोमवारी मतदान झालं असून, यंदा सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, मुंबई उपनगरांमध्ये मतदानात वाढ झाली. त्यामुळं या मतदानाच्या टक्केवारीनुसार मुंबईसह राज्यभरात कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पुन्हा युतीची सत्ता

मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप-शिवसेना युतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ६३.१३ टक्के मतदान झालं होतं. परंतु, यंदा यामध्ये घसरण (६०.४६ टक्के) झाली आहे.

टक्का घसरला

मुंबईत सन २०१४ मध्ये ५४ टक्के मतदान झाले होते, तर यावेळी मतदानाचा टक्का ४८.६३ वर घसरला आहे. मुंबई उपनगरांमध्ये मात्र २०१४च्या तुलनेत मतटक्का वाढल्याचे दिसत आहे. सन २०१४ मध्ये उपनगरांमध्ये ५०.१६ टक्के मतदान झालं होतं. मात्र यंदा ५१.१७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सर्वात कमी मतदान

राज्यात सर्वात कमी मतदान मुंबईतील कुलाबा मतदारसंघात ४०.२० टक्के, तर सर्वात जास्त मतदान कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात ८३.२० टक्के इतकं झालं आहे. मुंबईतील १० विधानसभा मतदारसंघांत सरासरी ४८.६३ टक्के, तर मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांत सरासरी ५१.१७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



हेही वाचा -

विधानसभा निवडणूक २०१९: १६०० मतदार मतदानापासून वंचित

राज्यात आतापर्यंत ५६.०२ टक्के मतदान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा