राज्यात आतापर्यंत ५६.०२ टक्के मतदान

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलांडली आहे. मतदानाची वेळ संपेपर्यंत मुंबई शहरात ४४.४० टक्के तर मुंबई उपनगरात ४६.९२ टक्के मतदान झालं.

SHARE

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची वेळ संपेपर्यंत सरासरी ५६.०२ टक्के मतदान झाले. राज्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदान झाले होते.  दुपारपर्यंत संमिश्र प्रतिसाद होता. मात्र दुपारनंतर मतदानाचा आकडा वाढला. 

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलांडली आहे. मतदानाची वेळ संपेपर्यंत मुंबई शहरात ४४.४० टक्के तर मुंबई उपनगरात ४६.९२ टक्के मतदान झालं. राज्यात काही ठिकाणी पाऊस असल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येत आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही.

तुरळक घटनांचा अपवाद वगळता राज्यात शांततेत मतदान पार पडलं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, गणेश नाईक, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख  आदी दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. हेही वाचा -

ठाणे: EVM च्या विरोधात 'त्याने' चक्क मशीनवर फेकली शाई!

सिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारण

संबंधित विषय
ताज्या बातम्या