एसटी चालकाचे अपहरण करून लुटणारे अटकेत

तिघांनी चालकाला बेदम मारहाण केली. एकाने मोबाइल काढून घेतला, तर दुसऱ्याने गळ्यातील चैन हिसकावली.

  • एसटी चालकाचे अपहरण करून लुटणारे अटकेत
SHARE
पोलिस असल्याचे सांगून नागरिकांंना लुटणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाळू नाना पोटे (५७), सखाराम टेटकारे (३५) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. नुकतीच या टोळीने घाटकोपर येथे एका एसटी चालकाचे अपहरण करून त्याला चाकूच्या धाकावर लुटले होते. या दोघांना न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

घाटकोपरच्या रेल्वे स्टेशन  १८ आॅक्टोंबर रोजी एक एसटी चालक मोबाइलवर गेम खेळत होता. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्या चालकाची वाट अडवत हुज्जत घालण्यास सुरूवात केली. बोलता बोलता समोरील व्यक्तीने जवळच कारमध्ये बसलेल्या बाळू आणि सखाराम यांच्याजवळ चालकाला नेले. पोलिस असल्याचे सांगून दोघांनी चालकाला कारमध्ये जबरदस्ती बसवले. पोलिस ठाण्यात नेेतो असे सांगून तिघांनी चालकाला बेदम मारहाण केली. एकाने मोबाइल काढुन घेतला, तर दुसऱ्याने गळ्यातील चैन हिसकावली. गाडीच्या काचा वर असल्यामुळे चालक कुणाकडे मदत ही मागू शकत नव्हता.

काही अंतरावर गेल्यावर आरोपींनी चालकाजवळून त्याचे एटीएम कार्डही काढुन घेत, कार्डच्या पीन नंबरद्वारे त्याच्या खात्यावरील पैसे काढले.  त्यानंतर अनोळखी ठिकाणी चालकाला सोडून दिले. या प्रकरणी घाटकोपर पोलिसात चालकाने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेता. हा गुन्हा गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.हेही वाचा -

अमिताभ यांना ‘गुगल पे’ वर ४० हजारांना फसवले

संदीप देशपांडे यांना जामीन
संबंधित विषय
ताज्या बातम्या