अमिताभ यांना ‘गुगल पे’ वर ४० हजारांना फसवले

मोबाइलवर क्रेडिट कार्डची वॅलिटिडी संपत आल्याचा एक खोटा फोन आला होता. त्यानुसार त्यांना वॅलिटिडी वाढवण्यासाठी २ रुपये भरण्यास सांगितले. तसेच एक लिंक सुद्धा पाठवत त्यावर क्लिक केल्यानंतर २ रुपये भरले. म

अमिताभ यांना ‘गुगल पे’ वर ४० हजारांना फसवले
SHARES

मुंबईत सध्या प्रत्येकाचाच आॅनलाईन व्यवहार करण्याकडे कल असतो. मात्र हे व्यवहार करताना अनेकांची फसवणूक होते. असाच काहीसा प्रकार अमिताभ यांच्यासोबत घडला आहे. क्रेडिट कार्डची वॅलिटिडी संपत आल्याचा खोटा फोन अमिताभ यांना आला होता. वॅलिटिडी वाढवण्यासाठी त्यांना एक लिंक पाठवून त्यावरून २ रुपये भरण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  

अॅन्टॉप हिल येथे राहणारे व्यावसायिक अमिताभ राजवंश(46) यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डची वॅलिटिडी संपत आल्याचा एक खोटा फोन आला होता. त्यानुसार त्यांना वॅलिटिडी वाढवण्यासाठी २ रुपये भरण्यास सांगितले. तसेच एक लिंक सुद्धा पाठवत त्यावर क्लिक केल्यानंतर २ रुपये भरले. मात्र पुढच्या काही मिनिटात अमिताभ यांच्या बँक खात्यामधून ४० हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. त्यावेळी राजवंश यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वेळीच अमिताभ यांनी ‘गुगल पे’ ला जोडलेले खाते बँकेत फोन करून बंद केले.  

त्यानंतर अमिताभ ज्या फोनवरून फोन आला. त्यावर वारंवार फोन करत होते. मात्र तो फोन बंद येत होता. अमिताभ यांनी अॅन्टॉप हिल पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या पूर्वी ही अशा अनेक घडना घडल्या असून ‘गुगल पे’ च्या विश्वासहर्तेबाबत नागरिकांमध्ये आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

फसवणूक रोखण्यासाठी काय कराल?
०  फसवणूक करणाऱ्या व्यक्ती चलाखीनं आपण कस्टमर केअर अधिकारी आहोत अशी बतावणी करतात. त्याच्या बोलण्याची पद्धत एखाद्या बँक कर्मचाऱ्यासारखी असते. कॉल उचलला आणि तुम्हाला संशय आला तर बँकिंगसंबंधी विविध प्रश्न विचारा. त्यामुळं त्याचा गोंधळ उडेल आणि फोन स्वतःहून बंद करेल.
० बोगस अधिकारी बँक कर्मचारी असल्याचे सिद्ध करण्यासाठी काही पडताळणीसारखे उदा. तुमची जन्मतारीख, नाव, मोबाइल क्रमांक मागतील. थोडा तरी संशय आला तर त्यांना तुमची माहिती देऊ नका.
०  हे बोगस कस्टमर केअर अधिकारी तुमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी न केल्यास डेबिट-क्रेडिट किंवा मोबाइल बँकिंग सेवा ब्लॉक होऊ शकतात, असं सांगतात. ते होऊ नये म्हणून अनेक जण घाबरून या बोगस अधिकाऱ्यांना सर्व माहिती देतात. पण तसं करू नका.

०  कुठलाही अॅप डाउनलोड करू नका. बोगस कॉल करून ग्राहकाच्या मोबाइल फोनमध्ये रिमोट डिव्हाइस कंट्रोल अॅप म्हणजेच एनीडेस्क डाउनलोड करण्याचा ठकसेनांचा प्रयत्न असतो.
०  अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर बोगस अधिकारी ग्राहकाकडे अॅप कोडची मागणी करतात. कोड एका लॉग-इनसारखं काम करतात. या कोडद्वारे आपल्या फोनचा अॅक्सेस त्यांना मिळतो.

संबंधित विषय