संदीप देशपांडे यांना जामीन

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मागील शुक्रवारी अटक केली होती. त्यांना याप्रकरणी आता जामीन मिळाला आहे.

संदीप देशपांडे यांना जामीन
SHARES

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मागील शुक्रवारी अटक केली होती. त्यांना याप्रकरणी आता जामीन मिळाला आहे. तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर संदीप देशपांडे यांना सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन दिला आहे.

दादर-माहीममध्ये मनसेने लावलेले कंदील आणि बॅनर महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी काढले होते. यावेळी देशपांडे यांचा दिघावकर यांच्याशी वाद झाला होता. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली असा आरोप करण्यात आला. 

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी, शशांक नागवेकर, संतोष साळी  यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, सत्र न्यायालयाने वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. 



हेही वाचा - 

अमिताभ यांना ‘गुगल पे’ वर ४० हजारांना फसवले

पश्चिम रेल्वेवर धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा