मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून पक्षाचे झेंडे, कंदिल आणि बॅनर लावण्यात आले होते. याविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली होती. यावेळी संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्ते तेथे आले.

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
SHARES

पक्षाचे झेंडे, कंदिल आणि बॅनरविरोधात कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ७ ते ८ कार्यकर्त्यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तक्रार दाखल केली होती.

दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून पक्षाचे झेंडे, कंदिल आणि बॅनर लावण्यात आले होते. याविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली होती. यावेळी संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी पक्षाचे कंदील आणि झेंडे काढण्याची कारवाई थांबवण्याची मागणी केली. यावेळी देशपांडे यांनी पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रारही अधिकाऱ्यांनी दिली होती. 

 सरकारी कामात अडथळा आणि पालिका अधिकाऱ्याशी वाद आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. देशपांडे म्हणाले, मी कोणत्याही अधिकाऱ्याला शिव्या दिल्या नाहीत. कामाचा जाब विचारला म्हणून ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करणार असाल तर आम्ही जामीन घेणार नाही. शिवसेनेचे झेंडे काढले जात नाहीत. फक्त मनसेचे झेंडेच काढले जातात असा आरोपही संदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांवर केला आहे.हेही वाचा -
ACP च्या कार्यालयात पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
संबंधित विषय