Advertisement

ACP च्या कार्यालयात पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

नुकतेच गुरव यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. तर त्यांच्या भावाचे ही कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरव हे नैराक्षेत होते.

ACP च्या कार्यालयात पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
SHARES

मुंबईच्या साकीनाका येथील सहाय्यक पोलिस पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी एका पोलिस कॉन्स्टेबलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधीर गुरव  असे या पोलिस कॉन्स्टेबल चे नाव आहे.  या घटनेनंतर पोलिसदलात एकच खळबळ उडाली असून त्या कॉन्स्टेबलच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

साकीनाका येथील सहय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात रायटर म्हणून सुधीर गुरव (५५) हे कार्यरत आहेत. बुधवारी रात्री कार्यालयातील त्यांचे इतर सहकारी निघून गेल्यानंतर गुरव उशिरापर्यंत थांबले होते. सर्व सहकारी गेल्यानंतर गुरव कार्यालयाच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीला गळफास लावून आत्महत्या केली. सहायक पोलिस आयुक्तांचे चालक त्यांना घरी सोडून वाहन ठेवण्यासाठी कार्यालयात आले त्यावेळी त्यांना गुरव यांची बॅग दिसली.  त्यांनी गुरव यांना फोन केला असता गुरव फोन उचलत नव्हते. कार्यालयात आत शोधा शोध केल्यानंतर त्यांना लोखंडी शिडीला गुरव लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेहण्यात आले. मात्र डाँक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी अगर लिखित स्वरूपात काही न सापडल्याने गुरव यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र नुकतेच गुरव यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती. तर त्यांच्या भावाचे ही कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरव हे नैराक्षेत होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित विषय
Advertisement