२०१८-१९ या आर्थिक वर्षात रेल्वे बिघाडात 'इतकी' वाढ

२०१८-१९ या आर्थिक वर्षात रेल्वे बिघाडात वाढ झाली आहे.

SHARE

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा लोकलच्या बिघाडांच्या त्रासाला समोरं जावं लागतं. रेल्वे रुळाला तडा जाणं, ओव्हरहेड वायर तुटणं, इंजिनात बिघाड होणं यांसारख्या घटनांमुळं लोकल सेवा विस्कळीत होत असून, त्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होतो. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागात आर्थिक वर्ष २०१७-२०१८ च्या तुलनेत २०१८-२०१९ मध्ये रेल्वे बिघाडांमध्ये वाढ झाली आहे.

रेल्वे बिघाड

२०१७-२०१८ च्या आर्थिक वर्षात १५९८ वेळा रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवला होता. तर २०१८-२०१९ या काळातील आर्थिक वर्षात १८९५ वेळा बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील बिघाडाबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली होती.

हेही वाचा - मालाडमध्ये ३ मजली गोदामाला भीषण आग

लोकल फेऱ्यांवर परिणाम

मिळालेल्या माहितीनूसार, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सिग्नल बिघाडाच्या ९४९, इंजिन बिघाडाच्या ६२६ आणि रुळाला तडा जाण्याच्या २३ घटना घडल्या. तर एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत सिग्नल बिघाडाच्या १०६३, इंजिन बिघाडाच्या ८११ आणि रुळाला तडा जाण्याच्या २१ घटना घडल्या. या बिघाडांमुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा - मध्य रेल्वेच्या 'या' स्थानकांपर्यंत धावणार १५ डब्यांची जलद लोकल

विलंबाचा सामना

वारंवार होणाऱ्या बिघाडामुळं प्रवाशांना रेल्वे विलंबाचा सामना करावा लागत होता. त्यामुळं लोकल फेऱ्यांचा वक्तशीरपणा कायम राखण्यासाठी मुंबई विभागानं योग्य त्या उपाययोजना राबवण्याची शक्यता वर्तवली आहे.हेही वाचा -

कसला प्रस्ताव, जे ठरलंय ते करा, संजय राऊत यांनी पुन्हा ठणकावलं

एसटी चालकाचे अपहरण करून लुटणारे अटकेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या