चक्क, एसी लोकललाही बसतोय प्रदूषणाचा फटका!


SHARE

मुंबईकरांना रेल्वेतून गारेगार प्रवास करता यावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल धावत आहे. मात्र, या एसी लोकलला वायू प्रदूषणाचा फटका बसत असून, लोकलमध्ये धूळयुक्त हवा फेकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकलमधील एसीची हवा पुरवणाऱ्या फिल्टरमध्ये धुळीकण मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. धूळ, माती यांचे प्रमाण अधिक राहिल्यास एसी यंत्रणेत बिघाड होऊन लोकलमध्ये धूळयुक्त हवा फेकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंत्रणेची सफाई

एसी लोकलमधील फिल्टर देखभालीची ४५ दिवसांच्या आतच आवश्यकता निर्माण होते. परंतु, रेल्वे मंडळाच्या नव्या नियमांनुसार ६० दिवसांनतर एसीच्या यंत्रणेची सफाई करण्याचे आदेश आहेत. लोकल डब्यात थंड हवा पुरवणाऱ्या यंत्रणांमधील फिल्टरच्या माध्यमानं धूळ, माती आणि हवेतील सूक्ष्म कण फिल्टरच्या माध्यमानं दूर करण्यात येतात. त्यानंतर ही स्वच्छ हवा डब्यातील प्रवाशांना मिळते.

फिल्टरची सफाई

रेल्वे मंडळाच्या नव्या नियमांनुसार ६० दिवसांनंतर फिल्टरची सफाई करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याच बरोबर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकलमध्ये काही त्रुटी आढळल्यास नियोजित काळाच्या आधी त्याची तपासणी करण्याचा निर्णयाधिकार वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

डब्यात धूळयुक्त हवा

सद्यस्थितीत एसी लोकलमधील फिल्टरची साफसफाई ४५ दिवसांनी करण्यात येते. फिल्टर साफसफाईची कालमर्यादा वाढवल्यास एसी यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता आहे. यंत्रणेत बिघाड झाल्यास डब्यात धूळयुक्त हवा येण्याची शक्यता जास्त आहे.हेही वाचा -

पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन होणार प्रवास, १ डिसेंबरपासून 'हा' नियम लागू

मुख्य धावपट्टीच्या दुरूस्तीच्या कामामुळं २४ विमानं रद्दसंबंधित विषय
ताज्या बातम्या