Advertisement

मालाडमध्ये ३ मजली गोदामाला भीषण आग

मुंबईतील मालाड येथील एका गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली

मालाडमध्ये ३ मजली गोदामाला भीषण आग
SHARES

मुंबईतील मालाड येथील एका गोदामाला भिषण आग लागल्याची घटना घडली. ही आग परमार हाऊस इंडस्ट्रीयल इस्टेट, मामलेदारवाडी, काचपाडा येथील गाळ्याला लागली होती. हा तीन मजली गाळा होता. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

गोदामाला आग

ही आग लेवल ३ ची असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ८.०२ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा- कसला प्रस्ताव, जे ठरलंय ते करा, संजय राऊत यांनी पुन्हा ठणकावलं

जीवितहानी नाही

या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग नेमकी कशी लागली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी अग्नीशमन दलाचे ४-फा. वा., -वॉटर टँकर, ४ जम्बो वॉटर टँकर, १ रेस्क्यू वाहन, २ रुग्णवाहिका उपस्थित झाल्या होत्या.



हेही वाचा -

एसटीची हंगामी भाडेवाढ मागे, कमावले दररोज २ कोटी रुपये

पानिपतचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी उडवली अर्जुन कपूरची खिल्ली



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा