पानिपतचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी उडवली अर्जुन कपूरची खिल्ली

अर्जुनमुळे सिनेमा पडणार अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया गोवारीकर यांच्या ट्विटवर दिल्या आहेत.

SHARE

पानिपत या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात अर्जुन कपूर हा सदाशिवभाऊ यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे. संजय दत्त अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण अनेकांना सदाशिवरावांच्या भूमिकेतील अर्जुन कपूर खटकला आहे. अर्जुनऐवजी अन्य अभिनेत्याचा विचार गोवारीकर यांनी करायला हवा होता. अर्जुनमुळे सिनेमा पडणार अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया गोवारीकर यांच्या ट्विटवर दिल्या आहेतहेही वाचा

पानिपतचा ट्रेलर पाहून आली बाजीराव मस्तानी, पद्मावतची आठवण


संबंधित विषय
ताज्या बातम्या