आमच्या आमदारांना भाजपकडून फोन, काँग्रेस, राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फोन केले जात असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

SHARE

राज्यात सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी फोडाफोडीचं राजकारणंही सुरू झालं असून भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फोन केले जात असल्याचा गौप्यस्फोट खुद्द काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १३ दिवस उलटले आहेत. जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल देऊनही महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ८ नोव्हेंबरला रात्री १२ वाजता संपत आहे. यामुळे राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. महायुतीत सत्तास्थापनेवर एकमत न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता भाजपने फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप काँग्रेस- राष्ट्रवादीने केला आहे.

हेही वाचा- भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू, संजय राऊत यांची टीका

आमच्या काही आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत. येत्या काळात बळजबरी, धमकावणं हे प्रकारही होऊ शकतात. तशी शक्यता खुद्द २५ वर्षे भाजपसोबत मैत्री असलेल्या शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. मात्र, भाजपचं फोडाफोडीचं राजकारण आता यशस्वी होणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

तर, जितकी फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीच्या आधीच झाली आहे. निवडून आलेले सर्व आमदार नवे असून जनतेच्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरेलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार आता फुटणार नाही. शिवाय इतर कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू, असंही जयंत पाटील यांनी ठणकावलं.हेही वाचा-

'या' भितीमुळं शिवसेना सर्व आमदारांना हलवणार अज्ञात स्थळी

शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नाही, संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलंसंबंधित विषय
ताज्या बातम्या