Advertisement

भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू, संजय राऊत यांची टीका

भाजपकडे बहुमत असल्यासं त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं, परंतु महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरू नये. भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू, संजय राऊत यांची टीका
SHARES

भाजपकडे बहुमत असल्यासं त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं, परंतु महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरू नये. भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू असल्याची टीका शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले याची माहिती देण्यासाठी राऊत यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत म्हणाले की, २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव यांनी जी भूमिका मांडली होती, त्यात कुठलाही बदल झालेला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, या भूमिकेवर ते ठाम आहेत. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत.' याचा पुनरुच्चारही राऊत यांनी केला. 

काय म्हणाले राऊत?

  • शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही
  • स्वतःही सरकार स्थापन करायचं नाही आणि घटनात्मक पेच निर्माण करायचे, हे आता चालणार नाही.
  • महायुतीला जनतेचा कौल मिळाल्याचं भाजप सांगत असेल, तर भाजप सरकार स्थापन का करत नाही? 
  • महायुतीला मिळालेला जनादेश हा दोन्ही पक्षांत जे ठरलं त्यालाही मिळालेला आहे. 
  • २०१४ मध्ये भाजपने अल्पमतातलं सरकार बनवण्याचा प्रयत्न केला होता. 
  • पण तेव्हाची आणि २०१९ ची परिस्थिती वेगवेगळी आहे. 
  • आता कोणतंही कोणतीही घटनाविरोधी कृत्यं, दहशत, धमक्या, ब्लॅकमेलिंग, पोलिसी बळाचा वापर चालणार नाही. 
  • जोपर्यंत खुर्ची आहे, साम-दाम-दंड-भेद तोपर्यंत चालतो. सत्तेचा माज उतरल्यानंतर तो चालत नाही.  
  • जनतेला वेठीस धरण्याचं काम त्यांनी करू नये.
  • भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं पाप होत आहे
  • भाजपानं सरकार बनवण्यास असमर्थ असल्यास जाहीर करावं मग आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू 
  • आमचा मुख्यमंत्री कसा बनेल ते सभागृहात कळेल. संख्याबळ झालं आहे, ते सभागृहात दाखवू. 
  • आमच्याकडे पर्याय आहे, त्याशिवाय आम्ही बोलत नाही 



हेही वाचा-

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?

मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम, आमदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा