मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम, आमदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर बाहेर आलेल्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे सत्तास्थापनेसंदर्भात जो निर्णय घेतील, तो मान्य असल्याचं सांगितलं.

SHARE

जे आधी ठरलं होतं, त्यावर ठाम राहण्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत पुन्हा एकदा एकमताने घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार उपस्थित होते.

मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार असेल, तरच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चेसाठी फोन करावा, असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

या बैठकीनंतर बाहेर आलेले शिवसेना आमदार शंभूराजे देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 

लोकसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेनेत सत्ता वाटपाचा जो फाॅर्म्युला ठरला होता, त्यावर शिवसेना अजूनही ठाम आहे. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील निम्म्या वाट्यावर शिवसेनेचा दावा कायम आहे. या बैठकीत आमदारांनी कुठलीही मागणी केली नसून उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो सर्व आमदारांना मंजूर असेल, असं एकमताने त्यांना सांगण्यात आलं.

हेही वाचा- फडणवीस हे शिवसैनिकच, मुनगंटीवार यांचं अजब उत्तर

शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढतच चाललेला आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीतील कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी आमदारांना मोबाईलवर आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई होती. बैठकीनंतर बाहेर आलेल्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे सत्तास्थापनेसंदर्भात जो निर्णय घेतील, तो मान्य असल्याचं सांगितलं. 

आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना वांद्र्यातील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.  

दरम्यान भाजपचे नेते गुरूवारी दुपारी २ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि किरीट सोमय्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले आहेत.हेही वाचा-

शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नाही, संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपच देईल - संजय राऊतसंबंधित विषय
ताज्या बातम्या