Advertisement

फडणवीस हे शिवसैनिकच, मुनगंटीवार यांचं अजब उत्तर

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, या मागणीवर ठाम असलेल्या शिवसेनेला उत्तर देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला शिवसैनिकच समजतात, असं म्हटलं.

फडणवीस हे शिवसैनिकच, मुनगंटीवार यांचं अजब उत्तर
SHARES

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, या मागणीवर ठाम असलेल्या शिवसेनेला उत्तर देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे फडणवीस यांच्या रुपयाने एका अर्थाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री राज्यात असल्याचं वक्तव्य केलं.

भाजपाचं प्रतिनिधी मंडळ गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुनगंटीवार म्हणाले की,

आम्ही राज्यपालांना भेटून त्यांच्यासोबत सरकार स्थापनेबाबतच्या घटनात्मक तरतुदींबाबत चर्चा करणार आहोत. त्यानंतरच सरकार स्थापनेचा दावा करायचा की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल. जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिल्याने राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होईल, याचा आम्हाला विश्वास आहे. 


हेही वाचा- 'या' भितीमुळं शिवसेना सर्व आमदारांना हलवणार अज्ञात स्थळी

आमदार फूटणार नाहीत

आमदार फोडण्याच्या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, हजारो, लाखो मतदारांच्या मतदानामुळे निवडून येणाऱ्या आमदाराविषयी अपशब्द काढणं चुकीचं आहे. कुठल्याही आमदारांचा सन्मान राखलाच पाहिजे. भाजप असो किंवा शिवसेना सर्व आमदार विचाराने पक्के असतात. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केला तरी ते फुटू शकणार नाहीत, असंही मुनगंटीवार म्हणाले.

 'शिवसेनेचाच मुख्यमंत्री'

देवेंद्र फडणवीस हे स्वत: शिवसैनिकच समजतात. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसैनिक म्हटलं आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याचा मुख्यमंत्री शिवसैनिकच होणार असल्याचा पुनरुच्चारही मुनगंटीवार यांनी केला. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा राज्यात येणार नाहीत. त्यांच्या मनात दूर दूरपर्यंत तसा विचार नसल्याचंही ते म्हणाले.



हेही वाचा-

शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नाही, संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपच देईल - संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा