Advertisement

शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नाही, संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं

शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री असल्याचं राऊत म्हणाले.

शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नाही, संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलं
SHARES

महाराष्ट्रातील सत्ताकलह सुरू असताना सत्ताधारी इतर पक्षातील आमदार फोडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या गुरूवारी सकाळी पसरल्या. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत कुणाकडेही नसल्याचं म्हटलं.    

संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केलं. सत्ताधारी पक्षाकडून नेहमीच कधी धाक दाखवून तर कधी पैशांचं आमिष दाखवून फोडाफोडीचं राजकारण केलं जातं. हरियाणा, कर्नाटक आणि इशान्येकडील राज्यात जे झालं ते सर्वांनाच माहीत आहे. परंतु पारदर्शकतेचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्यांनी असं करणं चुकीचं असल्याचं राऊत म्हणाले.  

हेही वाचा- शिवसेनेच्या होकाराशिवाय भाजप राज्यपालांना भेटणार, पण चर्चा प्रदेशाध्यक्ष बदलाचीच

इतर पक्षातील काही नेत्यांकडून आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादीतील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचं सांगण्यात आल्याचा खुलासा राऊत यांनी केला. त्यावर असेच प्रयत्न शिवसेनेच्या आमदारांनाही फोडण्यासाठी होत आहेत का?  शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय का? असा प्रश्न विचारला असता शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री असल्याचं राऊत म्हणाले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात कोणती चर्चा झाली का? या प्रश्नावर अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं ते म्हणाले. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक घेऊन त्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं- संजय राऊत

'या' भीतीमुळं शिवसेना सर्व आमदारांना हलवणार अज्ञात स्थळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा