वाचाळविरांमुळे युतीत दरी, मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्ष राऊतांवर टीका

शिवसेनेकडून होणाऱ्या टीकांना भाजपकडून त्याच भाषेत चोख प्रतिउत्तर देता आलं असतं. मात्र आम्ही संयम बाळगल्याचं फडणवीस म्हणाले.

SHARE

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याजवळ आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसून मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांबाबत शिवसेनेचे नेते आणि मुखपत्रातून वारंवार टीका करणं निंदनीय आहे. अशा टीकांना भाजपकडून त्याच भाषेत चोख प्रतिउत्तर देता आलं असतं. मात्र आम्ही संयम बाळगल्याचं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा विषय झालाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवरून शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युलावर अडून राहिली. शिवसेनेकडून दररोज भाजपसह त्यांच्या मोठ्या नेत्यांवर टीका करण्यात येत होती. टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल. परंतु त्यांचं नाव न घेताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली. 

शिवसेनेच्या काही नेत्यांमुळेच युतीत दरी निर्माण झाली. कॅमेऱ्यासमोर बोलण्यामुळे त्यांना मीडिया स्पेस नक्की मिळला. पण अशा बोलण्याने सरकार बनत नाही. शिवसेनेच्या मुखपत्रातून ज्या पद्धतीने टीका केली जाते. त्याला त्याच जबरदस्त भाषेत चोख प्रतिउत्तर देता आलं असतं. मात्र आमची ती संस्कृती नाही. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.

आम्ही तोडणारे नाही जोडणार लोकं आहोत. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. आम्ही आजही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेबांचा आदर करतो.  उद्धवजींबद्दल आमच्या कुठल्याही नेत्यानं एकही वक्तव्य केलं नाही. मात्र गेल्या १० दिवसांत नरेंद्र मोदींवर जी खालच्या दर्जाची टीका झाली. त्यामुळे अशा सरकारमध्ये सोबत रहाव का? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्याचं, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 


हेही वाचा-

भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही - संजय राऊत

भाजपकडून शिवसेना आमदाराला ५० कोटींची आॅफर, वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोपसंबंधित विषय
ताज्या बातम्या