Advertisement

कामाला लागा, भाजपचं ३ दिवसीय बैठकांचं आयोजन

राज्यात सद्यस्थितीत राष्ट्रपती राजवट सुरू असली, तरी भविष्यात फेरनिवडणुकांची शक्यता गृहीत धरून ​भाजपने​​​ पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीची तयारी सुरू केली आहे.

कामाला लागा, भाजपचं ३ दिवसीय बैठकांचं आयोजन
SHARES

राज्यात सद्यस्थितीत राष्ट्रपती राजवट सुरू असली, तरी भविष्यात फेरनिवडणुकांची शक्यता गृहीत धरून भाजपने पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी गुरूवारपासून ते शनिवारपर्यंत सलग ३ दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत राज्यातील भाजप आमदार, पराभूत उमेदवार, जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री इ. सहभागी होतील.

हेही वाचा- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार बच्चू कडू आक्रमक

मुंबईतील दादरच्या वसंतस्मृती या भाजप मुख्यालयात ही तीनदिवसीय बैठक होणार आहे. आमदारांच्या बैठकीने संध्याकाळी या बैठकांना सुरूवात होणार आहे. या तीनदिवसीय बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात येईल. पराभूत उमेदवारांच्या पराभवामागची कारणे शोधण्यात येतील. तसंच संघटना मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, याचाही आढावा घेण्यात येईल. 

या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असून ते आमदारांना मार्गदर्शन करतील. भाजपच्या मंडल अध्यक्ष ते प्रदेशाध्यांपर्यंतच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रमही या बैठकीत ठरवण्यात येईल.    



हेही वाचा-

शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरील दावा चुकीचाच, महाराष्ट्रातील सत्तापेचावर अमित शहा पहिल्यांदाच बोलले

शिवसेनेनेही वारंवार मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं - संजय राऊत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा