Advertisement

शिवसेनेनेही वारंवार मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं - संजय राऊत

“शिवसेनेनेही वारंवार मुख्यंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी अमित शाह यांनी आक्षेप का व्यक्त केला नाही,” असं राऊत म्हणाले. “बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी स्पष्ट करायला हवं.”

शिवसेनेनेही वारंवार मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य केलं -  संजय राऊत
SHARES

महाराष्ट्राच्या राजकिय घडामोडींवर बुधवारी पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मौन सोडले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पून्हा  मुख्यमंत्री बनवणार याबाबत जाहीर बोललो होतो. त्यावेळीच शिवसेनेने का नाही आक्षेप घेतला असा प्रश्न शहा यांनी उपस्थित केला. शहा यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत घेतला.

सत्तास्थापनेची समीकरण जुळवताना राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहा यांनी आपले मौन सोडत मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने जाहिर सभेत आपली भूमिका बोलून दाखवली होती.  त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का नाही घेतला असे शहा यांनी  एका मुलाखतीत सांगितले. त्यावर शिवसेनेनेही मुख्यमंत्रीपदाचा दावा जाहिर सभेत केला असल्याचे प्रतिउत्तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. तर शहा हे नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचाः-  शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावरील दावा चुकीचाच, महाराष्ट्रातील सत्तापेचावर अमित शहा पहिल्यांदाच बोलले

“लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मातोश्रीवर झालेल्या चर्चेबद्दल भाष्य केलं. “शिवसेनेनेही वारंवार मुख्यंत्रीपदाबद्दल भाष्य केलं होतं. त्यावेळी अमित शाह यांनी आक्षेप का  व्यक्त केला नाही,” असं राऊत म्हणाले. “बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी स्पष्ट करायला हवं.” भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींचे बाळासाहेबांबरोबर खास नातं होतं. हे नातं ते पंतप्रधान होण्याआधीपासूनचं होतं. आता कोणीतरी मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू पाहत आहे असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

मुंबईमध्ये पत्रकार परिषदमध्ये त्यांनी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर झालेले बोलणे मोदींपर्यंत पोहचवायला हवं होतं असंही मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ‘बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे मोदींपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे,’ असंही राऊत म्हणाले.  

हेही वाचाः- तर, कुणीही माई का लाल जिंकून येणार नाही, असं का म्हणाले अजित पवार?

“बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी स्पष्ट करायला हवं. मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली ती साधीसुधी खोली नसून ती बाळासाहेबांची खोली होती. याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अनेकदा मोदींनी आशिर्वाद दिले आहेत. ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे,” असं राऊत म्हणाले.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा