राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार बच्चू कडू आक्रमक

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. राजभवनकडे जाणाऱ्या या मोर्चाला नरिमन पाॅईंड इथं अडवत पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतलं.

SHARE

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्यात आला. राजभवनकडे जाणाऱ्या या मोर्चाला नरिमन पाॅईंड इथं अडवत पोलिसांनी कडू यांना ताब्यात घेतलं. यावेळी शेकऱ्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आधीच लांबलेला पाऊस त्यात कयार वादळामुळे आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेलं आहे. अवकाळी पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील कांदा, भात, मका, नाचणी आणि वरई इ.शेतातलं उभं पिक आडवं झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी सर्वपक्षीय नेत्यांची मागणी असली, तरी त्या दिशेने कुठलीच हाचलाच होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे पेच आणखीनच वाढला आहे.

त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. परंतु पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा अडवत बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं.

राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. हेही वाचा-

उद्धव ठाकरे -अहमद पटेल यांची बैठक झालीच नाही; अफवा पसरवणं बंद करा - संजय राऊत

तर, कुणीही माई का लाल जिंकून येणार नाही, असं का म्हणाले अजित पवार?संबंधित विषय
ताज्या बातम्या