न्यायदेवतेला दंडवत, पुन्हा अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला आहे. यासाठी मी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत घालत आहे, असं सांगत येत्या २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्येला जाण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

SHARE

वादग्रस्त अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले. 

मला असं वाटतं जी हिंदूंची श्रद्धा आहे, भावना आहे त्या भावनेला आज न्याय मिळालेला आहे, याचा आनंद व्यक्त करत असताना मी सर्वांना सूचना केलेल्या आहेत की कुठेही वेडवाकड होईल असा काही करू नका, आनंद जरूर साजरा करा.

तसंच गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला मी शिवनेरीची माती अयोध्येत ठेवली होती. त्यानंतर वर्षभराच्या आत या प्रकरणाचा निकाल लागला. त्यामुळे आपण येत्या दोन-तीन दिवसांत शिवनेरीवर तर २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा अयोध्येत जाणार असल्याचेही उद्धव यांनी जाहीर केलं.हेही वाचा-

आजच्या दिवशी बाळासाहेब हवे होते, अयोध्या निकालावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रियासंबंधित विषय
ताज्या बातम्या