Advertisement

आजच्या दिवशी बाळासाहेब हवे होते, अयोध्या निकालावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पण हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

आजच्या दिवशी बाळासाहेब हवे होते, अयोध्या निकालावर राज ठाकरेंची  भावनिक प्रतिक्रिया
SHARES

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी निकाल दिला. संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं. न्यायालयाच्या निकालानंतर वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पण हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

काय आहे निकाल?

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानुसार पुढील ३ महिन्यांच्या आत रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे तसंच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी ५ एकरांची पर्यायी जागा देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.


त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं त्याचं आज सार्थक झालं. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

आता लवकरात लवकर राममंदिराची उभारणी व्हायला हवी आणि ‘रामराज्य’ देखील यायला हवं. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता.



हेही वाचा- न्यायदेवतेला दंडवत, पुन्हा अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा